Ad will apear here
Next
‘फिश-ओ-फिश’ पोषक मत्स्य पदार्थ पाककृती स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
डॉ. संजय सावंत आणि डॉ. हुकुमसिंह धाकर यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

रत्नागिरी :
जागतिक अन्नदिनानिमित्ताने रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयात १६ ऑक्टोबर रोजी ‘फिश ओ फिश’ ही पोषक मत्स्य पदार्थांची पाककृती स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 

‘भुकेलेल्यांना अन्न पुरविणे म्हणजे केवळ भूक भागवणे नव्हे, तर सकस अन्न पुरवून सशक्त पिढी निर्माण करणे,’ हे या वर्षीच्या अन्नदिनाचे घोषवाक्य होते. त्या पार्श्वभूमीवर, उच्च प्रतीच्या प्रथिनांचा स्त्रोत असलेल्या मत्स्य प्रकारांचा उपयोग करून, त्यापासून पौष्टिक पदार्थ तयार करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी दापोलीचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय यांनी ‘फिश-ओ-फिश’ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत मासे हा प्रमुख घटक वापरून त्यापासून तयार केलेले स्नॅक्स, सॅलड, तसेच मुख्य पदार्थ या तीन प्रकारात ३१ स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्व खाद्यपदार्थांचे चव, घटक पदार्थ, पौष्टिक गुणधर्म, तसेच कल्पक मांडणी या निकषांवर परीक्षण करण्यात आले. गद्रे मरीन एक्पोर्टस् येथील प्रशिक्षित व अनुभवी फूड टेक्नॉलॉजिस्ट स्नेहा पाटील, शेफ अनिकेत बंडबे आणि शेफ अनुप सावंत यांनी सर्व पाककृतींचे परीक्षण केले.

डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्याशी चर्चा करताना डॉ. संजय सावंत आणि डॉ.  संजय भावे

या स्पर्धेत पौष्टिक सॅलड या प्रकारात सौ. सारिका भडकमकर, शुभम माजिक यांना अनुक्रमे पहिले दोन क्रमांक मिळाले, तर काजल राठोड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. पौष्टिक स्नॅक्स या खाद्यप्रकारात मसाला किचन, रत्नागिरी आणि सारिका भडकमकर यांना पहिले दोन क्रमांक मिळाले. उत्तेजनार्थ पारितोषिक समिता शेट्ये यांना मिळाले. पौष्टिक मुख्य पदार्थ प्रकारातही प्रथम क्रमांक सारिका भडकमकर यांना मिळाला. द्वितीय क्रमांक प्रकाश पाटेकर यांना मिळाला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रांजली चोप्रा यांना देण्यात आले. 

या कार्यक्रमाला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत व विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे उपस्थित होते. त्यांनी स्पर्धकांशी चर्चा करून विविध खाद्यपदार्थांची माहिती घेतली.

स्पर्धेच्या अंतिम सत्रात सर्व विजेत्या स्पर्धकांना कुलगुरू डॉ. संजय सावंत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हुकुमसिंह धाकर, तसेच मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. आशिष मोहिते यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. 

या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी डॉ. दबीर पठाण, प्रा. श्रीकांत शारंगधर, डॉ. जयाप्पा कोळी, डॉ. अजय देसाई व प्रा. साईप्रसाद सावंत व ईएलपी कार्यक्रमांतर्गत विभागातील सर्व विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजनात डॉ. केतन चौधरी (विभागप्रमुख, विस्तार शिक्षण विभाग) आणि डॉ. स्वप्नजा मोहिते (विभागप्रमुख, मत्स्य जीवशास्त्र विभाग) यांचाही महत्त्वाचा सहभाग होता. या स्पर्धेच्या थीमच्या अनुषंगाने बॅनर, प्रशस्तिपत्रक, प्रसिद्धिपत्रके यांची रचना बहर महाकाळ यांनी केली होती. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZUMCF
Similar Posts
कोकणातील ‘टॅलेंट’ झळकले; नऊ जणींची कॉग्निझंट, इन्फोसिसमध्ये निवड रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील शिरगाव येथील बीसीए कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नऊ मुलींची कॉग्निझंट आणि इन्फोसिस या नामवंत आयटी कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. बीसीए कॉलेजसह पुणे येथील के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आयटी (बीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने या कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते
नर्सिंग कौशल्याद्वारे देशाच्या विकासात योगदान द्यावे रत्नागिरी : ‘विद्यार्थिदशा करिअर घडवणारी असून, नियमित व्यायाम, योगासने, योग्य वेळी नाश्ता, जेवण ही एक साखळी आहे. यातील कोणतीही गोष्ट अवेळी केल्याने प्रश्न उभे राहतात. त्यामुळे शिस्तीने वागावे, संगीत ऐकावे. त्यातून आपल्या क्षमतांचा विकास होतो. नर्सिंग कौशल्याद्वारे आपण देशाच्या विकासात योगदान द्यावे,’
रत्नागिरीत बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्राचे १७ नोव्हेंबरला उद्घाटन रत्नागिरी : सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र मोठ्या स्वरूपात काम करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन १७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीन वाजता मारुती मंदिर
मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक संशोधनाची चर्चा रत्नागिरी : ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास : आव्हाने आणि संधी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात सध्या सुरू आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी (१८ जानेवारी २०१९) सकाळी शाश्वत उत्पादन प्रणालीसह विविध विषयांवरील चर्चासत्रे पार पडली. दापोलीच्या डॉ.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language